गोल्डन बॉयचं नेटवर्थ देखील 'गोल्डन'

Manish Jadhav

भारताचा युवा आणि स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा देशाचे नाव उंचावले. नीरजने वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला.

Neeraj Chopra | Dainik Gomantak

2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकल्यावर नीरज पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. मात्र, तेव्हापासून आतापर्यंत त्याची नेटवर्थही खूप वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया नीरजच्या नेटवर्थबद्दल...

Neeraj Chopra | Dainik Gomantak

पानिपतमध्ये आलिशान घर

25 वर्षीय नीरज चोप्राचे हरियाणातील पानिपत येथे तीन मजली आलिशान घर आहे. एवढ्या लहान वयात नीरजने जवळपास सर्व काही साध्य केले आहे.

Neeraj Chopra | Dainik Gomantak

महागड्या कार

नीरजला महागड्या कारचा शौक आहे. त्याच्याकडे फोर्ड मस्टँग ही महागडी स्पोर्ट्स कार आहे. त्याची किंमत 93 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत आहे. इतकेच नाही तर नीरजने नुकतीच रेंज रोव्हर स्पोर्टही खरेदी केली. या लक्झरी एसयूव्हीची किंमत 1.98 कोटी ते 2.22 कोटी आहे.

Neeraj Chopra | Dainik Gomantak

बाइक्सचा शौक

नीरजच्या बाईक कलेक्शनमध्ये सर्वात महागडी बाईक Harley Davidson 1200 Roadster आहे, ज्याची किंमत 11 लाख रुपये आहे.

Neeraj Chopra | Dainik Gomantak

महागड्या ब्रँडसह जोडला गेला

नीरज महागड्या ब्रँडशी जोडला गेला आहे. त्यामधून तो करोडो रुपये कमवतो. जेव्हा त्याने ब्रँड्सशी करार केला तेव्हा त्याची सुरुवातीची कमाई 2.5 कोटींहून अधिक होती.

Neeraj Chopra | Dainik Gomantak

नीरज चोप्राची एकूण संपत्ती किती आहे?

अलीकडील अंदाजानुसार, नीरज चोप्राची एकूण संपत्ती सुमारे $4 ते $5 दशलक्ष एवढी आहे. आलिशान घर, पुरस्कार, कार इत्यादींमुळे नीरजची एकूण संपत्ती सतत वाढत आहे.

Neeraj Chopra | Dainik Gomantak

नीरजची संपत्ती 2020 मध्ये 10 कोटी, नंतर 2021 मध्ये 20 कोटी, 2022 मध्ये 30 आणि आता 2023 मध्ये त्याची एकूण संपत्ती 35 कोटी इतकी आहे.

Neeraj Chopra | Dainik Gomantak