Kavya Powar
कडुलिंब तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे.
कडुनिंबाचे सर्व भाग म्हणजे त्याचे मूळ, देठ, पाने, डिंक, बिया आणि तेल आरोग्यासाठी वापरता येते.
यामुळे पोटाशी संबंधित समस्या, लघवी आणि त्वचा रोगांवर ते फायदेशीर आहे.
हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे.
त्वचेशी संबंधित समस्या किंवा जखमांसाठी, कडुलिंबाची पावडर पाणी किंवा मध घालून पेस्ट तयार करून त्वचेवर लाऊ शकता.
गरम पाण्यात कडुलिंबाची पावडर किंवा पाने मिसळा आणि आंघोळीसाठी वापरा.
पाण्यात कडुलिंब उकळवा आणि थंड होऊ द्या. त्यानंतर या पाण्याने केस धुवा.