Akshata Chhatre
चेहऱ्यावरील पुरळ आणि मुरुमे तुमचा आत्मविश्वास कमी करू शकतात, पण निसर्गाकडे यावर एक सोपा उपाय आहे
तो म्हणजे कडुलिंब. कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-फंगल गुणधर्म भरपूर असतात.
यामुळे तो मुरुमांचे जिवाणू मारतो आणि त्वचेतील तेल नियंत्रित करतो.
तुमची त्वचा तेलकट असेल, तर कडुलिंब आणि मुलतानी मातीचा पॅक घाण शोषून घेतो आणि संसर्ग थांबवतो.
जळजळ आणि लालसरपणासाठी कडुलिंब आणि दह्याचा सूदनिंग पॅक लावा.
यात असलेले लॅक्टिक ॲसिड मृत त्वचा काढते. नवीन पुरळ आणि जुने डाग रोखण्यासाठी कडुलिंब, हळद आणि मध असलेला अँटीसेप्टिक पॅक सर्वोत्तम आहे
जर पुरळानंतर त्वचेवर डाग राहिले असतील, तर कडुलिंब आणि कोरफड जेलचा पॅक वापरा, जो त्वचेचा रंग सुधारतो.