Ganeshprasad Gogate
आंघोळ करताना अथवा चेहरा धुताना गरम पाण्याचा वापर न करता अगदी कोमट अथवा थंड पाण्याने चेहरा धुवा.
रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचा गर त्वचेवर लावून काही काळ ठेवा. त्यामुळे त्वचेमध्ये ओलावा टिकून राहील.
त्वचेवर रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावल्यास तेलातील स्निग्ध गुणामुळे त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होते
बदामाचे तेल चेहऱ्यावर लावा. त्यामुळे त्वचा मऊ होऊन त्वचेतील कोरडेपणा नाहीसा होईल.
थंडीच्या दिवसांमध्ये चेहऱ्याला मॉइच्युरायझर क्रीम लावा.
भरपूर पाणी प्या. त्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये आर्द्रता टिकून राहून त्वचा कोरडी पडणार नाही