Akshata Chhatre
गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘नव्याची पंचमी’ हा आगळावेगळा सण साजरा केला जातो.
या दिवशी शेतातून आणलेले ताजे नवधान घरामध्ये आणून त्याची पूजा केली जाते.‘नवे’ म्हणजे नवीन, म्हणूनच हा दिवस नव्या पिकाच्या आनंदोत्सवाचा प्रतीक मानला जातो.
ही पूजा म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाचं व निसर्गाच्या कृपेचे आभार प्रदर्शन असतं. ‘
‘नवे’ म्हणजे नवीन, म्हणूनच हा दिवस नव्या पिकाच्या आनंदोत्सवाचा प्रतीक मानला जातो.
काहीजण नवधानाचे पुंजके थेट गणपतीच्या मंदिरातही अर्पण करतात, तर घरात गणेशमूर्तीसमोर लटकवलेल्या माटोळीला किंवा मुख्य दारावर ते बांधले जातात.
या निमित्ताने ‘नव्याचो पायस’ तांदूळ आणि दुधाचा साधा पण गोड पदार्थ तयार केला जातो.
प्रथम हा गोड पदार्थ गणरायाला अर्पण करून नंतर कुटुंबीय आणि शेजाऱ्यांसोबत वाटला जातो.