गोमंतक ऑनलाईन टीम
महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याबाबत फारशी उत्सुक नाही. तसे तिनेही यापुर्वी सांगितले आहे.
तथापि, फॅशनचे शहर अशी ओळख असलेल्या पॅरिसमध्ये फॅशन शोमध्ये तीने मॉडेल म्हणून रॅम्प वॉक केला आहे.
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा थेट पॅरीस फॅशन वीकमध्ये सहभागी झाली.
नव्याची आई आणि बिग बींची कन्या श्वेता बच्चन-नंदी यांनी याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे.
नव्याने या रॅम्पवॉकवेळी रेड ड्रेस परिधान केला होता. अर्थात ती खूप नवखी असल्याचे तिच्या वॉकमधून जावणत होते. तिने हौशी म्हणून हा वॉक केल्याचेही कळून येत होते.
लॉरियल पॅरिस या ब्रँडसाठी नव्याने ह रॅम्पवॉक केला. तोच धागा पकडून श्वेता बच्चन यांनी लिटल मिस लॉरियल अशी कॅप्शन दिली आहे.
यावेळी नव्याची आजी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन देखील उपस्थित होत्या.