Kavya Powar
नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते. ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी.
या दिवशी भक्त कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी साधना करतात.
धाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा॥
म्हणजे जिच्या एका हातात अक्षमाला आणि दुसऱ्या हातात कमंडल. अशा महान देवी ब्रह्मचारिणीरूपा देवी दुर्गा मला आशीर्वाद देवो.
धर्मग्रंथानुसार, दुर्गा हिचा जन्म पर्वतराजापासून देवी पार्वती म्हणून झाला होता. महर्षी नारदजींच्या सांगण्यावरून तिने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी जंगलात कठोर तपश्चर्या केली आणि वर्षानुवर्षे उपवासही केला.
तिच्या हजारो वर्षांच्या कठोर तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव पडले आणि ती जप, तप, त्याग आणि ज्ञानाची देवी मानली जाते.
कठोर तपश्चर्येनंतर देवी ब्रह्मचारिणीने पुन्हा तीन हजार वर्षे तपश्चर्या केली आणि महादेवाची पूजा करत राहिली.
यानंतर देवीने अनेक वर्षे निर्जल राहून तपश्चर्या केली. तिच्या निर्जल आणि व्रतस्थ तपश्चर्येमुळे तिला 'अर्पणा' हे नावही पडले.
त्यांची उपासना केल्याने मन कठीण संघर्षात विचलित होत नाही आणि मनुष्य त्याग, संयम, नैतिकता आणि सर्व सिद्धी प्राप्त करतो.