Kavya Powar
नवरात्रीचा सहावा दिवस देवी कात्यायनी समर्पित आहे.
पौराणिक कथेनुसार कात्या गोत्रात एक जगप्रसिद्ध महर्षी होते, त्यांचे नाव कात्यायन होते. त्याना मुलगी नव्हती.
महर्षींनी देवी जगदंबेची पूजा केली आणि मुलगी होण्यासाठी कठोर तपश्चर्या केली.
महर्षींच्या कठीण तपश्चर्येने आई जगदंबा प्रसन्न झाली आणि महर्षी कात्यायनच्या पोटी देवी कात्यायनीचा जन्म झाला.
कात्यायनी मातेचे रूप अतिशय भव्य-दिव्य असून तिचा रंग तेजस्वी आहे. आई कात्यायनी सिंहावर स्वार आहे. तिला चार हात आहेत, त्यामुळे तिला चतुर्भुज देवी असेही म्हणतात.
माता कात्यायनीच्या हातात तलवार, कमळ, अभय मुद्रा आणि वर मुद्रा धारण केलेली आहे.
देवीची पूजा केल्याने रोग, शोक, वेदना, भय नाहीसे होऊन अनेक जन्मांचे संकट दूर होते.