Kavya Powar
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री मातेची पूजा केली जाते.
देवीचे सातवे रूप संकटातून सुटका करणारे मानले जाते. रात्री कालरात्री देवीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
पुराणानुसार, शुंभ आणि निशुंभासह रक्तबीजचा नाश करण्यासाठी देवीने कालरात्रीचे रूप धारण केले होते.
कालरात्री देवीचा रंग कृष्ण आहे, म्हणून तिला कालरात्री म्हणतात.
गाढवावर स्वार असलेल्या कालरात्रीला तीन डोळे आहेत.
मातेच्या चार हातांत तलवार व काटेरी लोखंडी शस्त्र आहेत तसेच तिच्या गळ्यातली माळ विजेसारखी चमकते.
देवीचे एक नाव शुभंकारी देखील आहे. भूत, आत्मा किंवा वाईट शक्ती, शत्रू आणि विरोधक यांच्या भीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी देवी कालरात्रीची उपासना केली जाते.
आरतीने कालरात्री माता लवकर प्रसन्न होते.