Kavya Powar
चैत्र नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची पूजा केली जाते.
देवी स्कंदमाता ही स्कंदकुमार आणि भगवान कार्तिकेय यांची आई आहे. स्कंददेव देवीच्या मांडीवर बसले आहेत.
देवीचे पूजन केल्याने साधकाला संततीप्राप्तीचा मार्ग सुकर होतो.
या रूपात आई सिंहावर स्वार होऊन अत्याचारी राक्षसांचा वध करते. शिवाय पर्वतराजाची कन्या असल्यामुळे तिला पार्वती देखील म्हणतात.
देवी अभय मुद्रेत कमळाच्या फुलावर विराजमान आहे. म्हणूनच तिला पद्मासन देवी आणि विद्यावाहिनी दुर्गा असेही म्हणतात.
स्कंदमाता डोंगरावर राहून प्रापंचिक प्राण्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करते.
भगवान कार्तिकेयाला मांडीवर घेऊन सिंहावर स्वार झालेली माता, सांसारिक आसक्तीमध्ये राहूनही भक्तीचा मार्ग अवलंबू शकतो हा संदेश आपल्या भक्तांना देते.
जेव्हा वेळ येईल तेव्हा बुद्धी आणि विवेकाने राक्षसांचा नाश केला पाहिजे, असे माता सांगते