Akshata Chhatre
देशभरात विविध ठिकाणी सध्या शारदीय नवरात्र सुरू झाले आहे.
देवीचा नऊ दिवसांचा हा उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
गोव्यातही नवरात्रीचा उत्साह कायम असून, ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये 'मखरोत्सव' साजरा केला जातो.
देवीला मखरात बसवून झोका देण्याचा हा सोहळा अभूतपूर्व असतो.
राज्यातील अनेक मंदिरांमध्ये हा उत्सव साजरा होत असला तरी, फोंडा तालुक्यातील केरी येथील श्री विजयदुर्गा मंदिराचा नवरात्र उत्सव याला अपवाद आहे.
अनेकांना जरी असा गैरसमज असला की देवीचं नवरात्र सगळीकडेच असेल, पण तसं नाही.
या मंदिरात शारदीय नवरात्र साजरं न करता, मार्गशीर्ष महिन्यात देवीचं नवरात्र आणि मखरोत्सव साजरा केला जातो.