Akshata Chhatre
आजकाल केसगळती ही एक सामान्य समस्या बनली आहे.
अपुरी झोप, ताण, पोषक तत्वांची कमतरता आणि प्रदूषण यांमुळे ही समस्या वाढते.
सकाळी रिकाम्या पोटी २-३ आवळे, १ बीटरूट, १ चमचा आल्याचा रस आणि चिमूटभर काळी मिरी एकत्र करून हे पेय प्या.
दररोज सकाळी एक चमचा आवळ्याचा रस कोमट पाण्यात मिसळून प्या. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते
बीटरूटमध्ये प्रथिने, लोह, फॉलिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.
पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीरातील पोषक तत्वांचे शोषण वाढवण्यासाठी आल्याचा रस खूप फायदेशीर आहे.
काळी मिरी शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि इतर आयुर्वेदिक घटकांचे शोषण करण्याची क्षमता वाढवते.