दैनिक गोमन्तक
आजकाल केसगळतीचे प्रमाण खूप जास्तच प्रमाणात वाढले आहे.
माक्रेटमध्ये अनेक प्रकारचे नवनविन केमिकलयुक्त प्रोडक्ट येत असतात, त्यामुळे केसांच्या जास्त समस्या वाढू शकतात.
महागडे शॅम्पू आणि तेल वापरुन सुद्धा केस पूर्वीसारखे चांगले का राहत नाहीत, याचा विचार केला आहे का?
तर मग तुम्हाला तुमचे केस मजबूत करायचे असतील तर तुम्ही घरगुती उपाय करु शकतात.
खोबरेल तेल आणि कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर असतात, म्हातारे लोक अजूनही खोबरेल तेल लावतात.
कढीपत्त्यात असलेले पोषक घटक केस मजबूत करतात, तर खोबरेल तेल गरम करुन त्यात कढीपत्ता घाला, आणि या तेलाने केसांना मसाज करा.
कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून केसांना लावा, तसेच कडुलिंबाच्या लाकडाचा कंगवा वापरल्याने केस तुटणेही थांबेल.
शिकेकाई पावडरची पेस्ट केसांवर 10-15 मिनिटे लावून त्यानंतर केस धूवा, यामुळे कोंडा आणि ड्राय स्किनसारख्या समस्या दूर होतात.
मेथीची दाणे भिजवून त्यानंतर बारीक करुन केसांना लावा, यामुळे केस मजबूत होतील आणि केसांना चमकही येते.