दैनिक गोमन्तक
विविध रंगानी उजळून निघणारा सण म्हणजे होळी होय. या सणाला आपण रंगाची उधळण करत आनंद साजरा करतो. मात्र अनेकदा कृत्रिम रंगांचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपण काही रंग घऱीच तयार करु शकतो.
सर्वात आकर्षक आणि लक्ष वेधून घेणारा रंग म्हणून पिवळा रंग प्रसिद्ध आहे. हा रंग घरीच बनवण्यासाठी डाळीचे पीठ आणि हळद 1:2 अशा प्रमाणात घेऊन ते 7-8 वेळा मिक्सरमध्ये बारिक करुन एकजीव करा. यात असणारी नैसर्गिक हळद तुमच्या त्वचेसाठी उत्तम असते.
लाल रंग तयार करण्यासाठी लाल जास्वंदीची फुलं वाळवून बारिक करा. त्यामध्ये डाळीचे पीठ मिक्स केल्यानंतर तुम्हाला परफेक्ट लाल रंग मिळेल.
केसरी रंग तयार करण्यासाठी पळसाच्या फुलांचा वापर केला जातो. ही फुलं पाण्यात भिजवून यापासून रंग तयार केला जातो. परंपरेने होळीला पळसाच्या फुलांचा नैसर्गिक रंग होळी खेळण्यासाठी वापरतात.
वाळलेल्या गोकर्णच्या फुलांची पेस्ट करुन त्याचा तुम्ही निळा रंग तयार करु शकतो.
हिरवा रंग तयार करण्यासाठी तुम्ही मेंहदी पाऊडर आणि तांदळाचे पीठ एकत्र करुन हा रंग तयार करु शकतो. मात्र हे करताना मेंहदीमुळे तुमच्या कपड्यांवर किंवा त्वचेवर रंग राहू शकतो.
अशा प्रकारे, नैसर्गिक रंगांनी तुमची होळी आणखी स्पेशल बनवू शकता.