दैनिक गोमन्तक
2006 पासून दरवर्षी 23 मार्चला नॅशनल पपी डे ( National Puppy Day ) साजरा केला जातो.
रस्त्यावर फिरणाऱ्या श्वानांबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी, प्राणी दत्तक घेण्याविषयी लोकांंमध्ये जागरुकता वाढावी हा उद्देश यापाठीमागे आहे.
अत्यंत प्रामाणिक अशी श्वानांची ओळख आहे. तुम्ही कितीही थकला असाल, कंटाळलेले असाल तरीदेखील तुमच्या घरात असलेले पाळीव श्वान तुमचा मूड ठीक करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
पूर्ण वाढ झालेल्या श्वानांबरोबच त्यांची पिल्ले जास्त निरागस असतात, माणसांना ती लळा लावतात. त्यामुळे अशी पिल्ले जर रस्त्यावर असतील त्यांची योग्य काळजी घेतली जावी, त्यांना दत्तक घ्यावे याबाबत लोकांंमध्ये जागरुकता पसरावी यासाठी हा 'नॅशनल पपी डे' साजरा करतात.
2006 साली प्राणी चिकित्सक Colleen Paige यांनी हा दिवस सुरु केला.
कुत्र्याची पिल्ले तुमच्या आजूबाजूला असतील तर तुमचा ताणतणाव कमी होण्यासदेखील मदत होतात.
तुम्हाला प्रामाणिक सोबत हवी असेल तर तुम्ही श्वानाच्या पिल्लांना दत्तक घेऊ शकता.