गोमन्तक डिजिटल टीम
नर्गिसचा जन्म 20 ऑक्टोबर 1979 रोजी झाला आहे. ती मुळची अमेरिकन मॉडेल आहे. अमेरिकन मॉडेल या रिअॅलिटी शोच्या सीझन 2 मध्ये ती स्पर्धक होती.
नर्गिसच्या आईचे नाव मेरी असून वडिलांचे नाव मोहम्मद आहे. नर्गिसचे वडील पाकिस्तानी होते. ती सहा वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता.
इम्तियाज अली दिग्दर्शित आणि रणबीर कपूर अभिनीत 'रॉकस्टार'मधून तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले होते. नर्गिसने हिंदीसह, तमिळ आणि तेलगु भाषेतील मिळून 15 चित्रपटांमध्ये काम केले.
सध्या नर्गिस तिच्या आगामी 'हरी हरा वीरा मल्लू' या तेलगु चित्रपटाचे चित्रिकरण करत आहे. यात पवन कल्याण मुख्य भुमिकेत आहे.
निर्मात्यांच्या सर्व अटी पुर्ण करण्यास नकार दिल्याने अनेक भुमिका हातातून गेल्याचा गौप्यस्फोट एका मुलाखतीत नर्गिसने केला होता. त्यानंतर काही काळ नर्गिस डिप्रेशनमध्ये होती.
नर्गिस चित्रपटांमध्ये फारशी दिसत नसली तरी सोशल मीडियात ती अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे 7.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.
नर्गिस ही बॉलीवूड अभिनेता उदय चोप्रा याला डेट करत होती. दोघे 5 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी लग्न केल्याच्या अफवादेखील तेव्हा पसरल्या होत्या.