Akshata Chhatre
इफ्फीत आयोजित एका कार्यक्रमात नागार्जुन यांनी वडील तथा दिग्गज अभिनेते अक्कीनेनी नागेश्वर राव यांच्याबद्दल माहिती दिली.
एएनआर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागार्जुन यांनी त्यांच्या साधेपणाविषयी भाष्य केले.
एएनआर यांच्यावर एक चित्रपट करण्यापेक्षा त्यांच्यावर एक माहितीपट बनवला तर त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी सर्वांना समजतील.
तेलगू भाषेत खूप श्रीमंत साहित्य आहे आणि त्यास प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे असेही त्यांना वाटायचे.
आम्ही आता अन्नपूर्णा स्टुडिओ उभारला आहे असे अक्कीनेनी म्हणाले.
एएनआर यांचे स्वप्न होते की कलाकारांसाठी एक उत्तम स्टुडिओ असावा.