गोमन्तक डिजिटल टीम
महाबळेश्वर सुंदर निसर्गासाठी आणि स्पेशल पॉईंट्ससाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर मध्ये सर्वात उंच पॉईंट एल्फिस्टन पॉईंट आहे.
पाचगणी महाराष्ट्रातील सुंदर थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील पाच डोंगरांच्या मधोमध हे गाव वसलेले आहे.
अमरावती जिल्ह्यात असलेले सातपुडा पर्वतरांगांत वसलेले चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे. तलाव, धबधबे आणि आसपासचा निसर्गरम्य परिसर यासह जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातले हे थंड हवेचे ठिकाण आहे. कोल्हापूर शहरापासून ५५ किमी लांब आहे आणि ह्या गावाजवळ गगनगड किल्ला आहे.
अलिबाग हे सुंदर बीच, कनकेश्वर किल्ला ह्यासाठी ओळखले जाते. यासह सिद्धेश्वर मंदिर, अलिबाग किल्ला, चौल, बिर्ला मंदिर, मुरुड जंजिरा किल्ला हे सर्व सुद्धा अलिबाग पासून जवळच आहेत.
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण आहे. गणपतीपुळ्याचे समुद्रकिनाऱ्यावर असलेले गणपतीचे देऊळ हे इथले प्रमुख आकर्षण आहे.
तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातले थंड हवेचे ठिकाण आहे हे सातपुडा पर्वतरांगांच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत अक्राणी तालुक्यात आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. हे अभयारण्य विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे.