Akshata Chhatre
घराच्या प्रवेशद्वाराला वास्तुशास्त्रात विशेष महत्त्व दिलं जातं. कारण घरात येणारी प्रत्येक ऊर्जा ही दारातूनच प्रवेश करते.
त्यामुळे तिथं लावलेली प्रतिमा, चिन्ह किंवा सजावट थेट घराच्या वातावरणावर परिणाम घडवते.
विघ्नहर्ता गणपती हे समृद्धी, सौख्य आणि मंगलकार्याचं प्रतीक मानले जातात. त्यामुळे घराच्या प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणं शुभ मानलं जातं.
पूर्वाभिमुख दारासाठी उगवत्या सूर्याचं चित्र अत्यंत फलदायी मानलं जातं. हे चित्र आरोग्य, यश आणि नवीन संधींचं प्रतीक आहे.
कमळ हे शुद्धतेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. ईशान्य किंवा पूर्वाभिमुख दारांसाठी कमळाचं चित्र विशेष लाभदायक ठरतं.
दक्षिणाभिमुख दार असल्यास घरात दिसेल अशा ठिकाणी सात घोड्यांचं चित्र ठेवणं यश, प्रगती आणि गतीचं द्योतक ठरतं.
याशिवाय मोराचे पिसे, पाण्याशी निगडीत चित्रं (उत्तराभिमुख दारासाठी), तसेच जोडीदार हत्ती (पश्चिम किंवा नैऋत्य दारासाठी) हेसुद्धा शुभ मानलं जातं.