Rahul sadolikar
कस्तुरी मृग आपल्या सर्वांना माहीत आहेच; पण आज आम्ही तुम्हाला या हरणाच्या काही अपरिचित गोष्टी सांगणार आहोत.
कस्तुरी मृगाला ( Moschus moschiferus ) सायबेरियन कस्तुरी मृग असेही म्हणतात.
कस्तुरी हरण हा लाजाळू प्राणी असून तो सायबेरियापासून हिमालयापर्यंतच्या डोंगराळ प्रदेशात आढळतो .
कस्तुरी हरण राखाडी तपकिरी रंगाचे असून त्याच्या शरीरावर लांब, खडबडीत, केस असतात आणि खांद्यावरचे केस 50-60 सेमी (20-24 इंच) उंच असतात.
नर कस्तुरी मृगाला कुत्र्यासारखे लांब सुळे असतात जे तोंडातून खालच्या बाजूने बाहेर आलेले दिसतात. मादीला दात नसतात.
कस्तुरीचा अत्तर आणि साबणांमध्ये वापरण्यासाठी त्या अवयवाती कस्तुरीचे मूल्य आहे .
कस्तुरी हरिण प्रामुख्याने कस्तुरीसाठी पकडले जाते. हे एक असं सुगंधी द्रव्य आहे ज्याचा वापर मानवाकडून परफ्युम आणि अत्तरांमध्ये तसेच साबणांमध्ये वापरला जातं. हे कस्तुरी द्रव्य फक्त नरांमध्ये आढळतं.
नैसर्गिक परफ्यूम बेस म्हणून कस्तुरीचा वापर मानवाच्या लक्षात आल्यानंतर परफ्यूममध्ये कस्तुरीचा वापर वाढला. कस्तुरी हरणाची त्याच्या बहुमोल 'कस्तुरी पाऊच' साठी खूप पूर्वीपासून शिकार केली जात आहे. 1855 मध्ये, सुमारे 81,200 पिशव्या रशियातून चीनला कयाख्ता मार्गे निर्यात करण्यात आल्या होत्या.