Akshay Nirmale
संगीतकार अनिरूद्ध रविचंदर (Anirudh Ravichander) हा सध्या भारतातील एक आघाडीचा संगीतकार बनला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःच्या संगीताची जादू त्याने दाखवून दिली आहे.
'3' हा तमिळ चित्रपट संगीतकार म्हणून अनिरूद्धचा पहिला चित्रपट होता. यातील अभिनेता धनुषचे कोलावरी डी गाणे तेव्हा प्रचंड गाजले होते.
दक्षिणेतील थलपती विजय, धनुष, रजनीकांत, कमल हसन यांच्या मास्टर, मारी, जेलर, बीस्ट, विक्रम या चित्रपटांना अनिरूद्धचे संगीत आहे.
अनिरूद्ध परदेशात गेला होता. पण शाहरूखचा स्वदेस चित्रपट पाहून तो भारतात परतला. शाहरूखसोबत काम करण्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता.
अनिरूद्ध हा शाहरूखचा मोठा फॅन आहे. त्याने शाहरूखचा कल हो ना हो हा चित्रपट सात वेळा पाहिला आहे.
याच वर्षी शाहरूख खानच्या जवान चित्रपटाद्वारे अनिरूद्धने बॉलीवूडमध्ये संगीतकार म्हणून पाऊल ठेवले आहे.