Akash Madhwal च्या 5 धावांत 5 विकेट्स

Pranali Kodre

मुंबईचा विजय

आयपीएल 2023 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला 81 धावांनी पराभूत केले.

Akash Madhwal | www.iplt20.com

महत्त्वाचा वाटा

मुंबईच्या या विजयात वेगवान गोलंदाज आकाश मधवालने महत्त्वाचा वाटा उचलला.

Akash Madhwal | www.iplt20.com

मधवालची कामगिरी

एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडलेल्या या एलिमिनेटर सामन्यात मुंबईकडून मधवालने 3.3 षटके गोलंदाजी करताना 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

Akash Madhwal | www.iplt20.com

कुंबळेची बरोबरी

मधवालची ही कामगिरी आयपीएलमधील चौथे सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन ठरले आहे. मधवालने अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे.

Akash Madhwal | www.iplt20.com

अनिल कुंबळे

कुंबळेनेही रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून 2009 मध्ये केपटाऊनमध्ये झालेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 5 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या.

Anil Kumble | Twitter

अल्झारी जोसेफ

आयपीएलमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर अल्झारी जोसेफ असून त्याने 2019 मध्ये मुंबई इंडियन्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 12 धावात 6 विकेट्स घेतल्या होत्या.

Alzarri Joseph | Twitter

सोहेल तन्वीर

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सोहेल तन्वीरने राजस्थान रॉयल्सकडून चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 2008 मध्ये 14 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

Sohail Tanvir | Twitter

ऍडम झम्पा

ऍडम झम्पा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 2016 मध्ये 19 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.

Adam Zampa | Twitter
Shubman Gill | Dainik Gomantak