Akshay Nirmale
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाची हेलिकॉप्टरमधून पाहणी केली.
या हवाईपाहणीचे फोटोज आणि व्हिडिओज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
या महामार्गाचे विंहमग दृश्य या फोटोजमधून समोर आले आहे.
या महामार्गाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करणार असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
भूसंपादन प्रक्रिया, भूसंपादन मोबदला वाटपातील विलंब व वन्य जमिनीच्या मंजूरीस विलंब यामुळे हे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.
तथापि, आता हे काम प्रगतीपथावर असून आधी फेब्रुवारी २०२४ ची डेडलाईन दिली गेली होती, पण आता डिसेंबरअखेर काम पूर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्ग हा हायस्पीड असणार असल्याची घोषणा काही काळापुर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.