Pranali Kodre
टी20 क्रिकेटमध्ये 20 वे षटक अनेकदा महत्त्वाचे ठरते. या षटकात बऱ्याचदा फलंदाजी करणाऱ्या आणि गोलंदाजी करणाऱ्या अशा दोन्ही खेळाडूंवर दबाव असतो.
असे असताना या षटकात मोठे फटके खेळणे सोपे नाही. पण तुम्हाला माहित आहे का आयपीएलमध्ये 20 व्या षटकात केवळ एक खेळाडू आहे, ज्याने 50 हून अधिक षटकार ठोकले आहेत.
हा खेळाडू म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आहे.
धोनीने आयपीएलमध्ये 20 व्या षटकात 31 मार्च 2023 पर्यंतच्या आकडेवारीनुसार 53 षटकार मारले आहेत.
आयपीएलमध्ये 20 व्या षटकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये अव्वल क्रमांकावरील धोनीच्या आसपासही कोणी नाही.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड असून त्याने 20 व्या षटकात आयपीएलमध्ये 33 षटकार मारले आहेत.
त्यानंतर रविंद्र जडेजाचा नंबर लागतो. जडेजाने आयपीएलमध्ये 20 व्या षटकात 26 षटकार मारले आहेत.
तसेच चौथ्या क्रमांकावर असलेल्या हार्दिक पंड्याने २० व्या षटकात आयपीएलमध्ये 25 षटकार मारले आहेत.
पाचव्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने 20 व्या षटकात आयपीएलमध्ये 23 षटकार मारले आहेत.