Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असल्याने नेहमीच चर्चेत असतो.
त्यातही धोनीच्या हेअरस्टाईलची चर्चा तर अगदी सुरुवातीपासूनच होत आली असून सध्या तो अशाच कारणासाठी पुन्हा चर्चेत आला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी 2023 वर्ल्डकपपूर्वी नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसला असून त्याचे फोटो प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट आलिम हाकिमने शेअर केले आहे.
हाकिमने धोनीने नव्या हेअरस्टाईलमधील अनेक फोटो शेअर केले असून त्यामागील कहाणी देखील सांगितली आहे.
धोनीने जेव्हा भारतासाठी खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा त्याचे लांब केस होते, पण नंतर त्याने ते कापले. मात्र आता पुन्हा त्याने केस वाढवले आहेत.
यामागील कहाणी हाकिमने सांगितली की मागच्या आयपीएलवेळी धोनीने चाहत्याने बनवलेला एक फोटो त्याला दाखवला होता, ज्यात त्याचे लांब केस होते. ते हाकिमला आवडले आणि त्याने धोनीला केस वाढवण्यास सांगितले.
यानंतर धोनीने केस वाढवले आणि त्यानंतर हाकिमने त्याला नवी स्टाईक करत नवा लूक दिला आहे.
धोनीचा हा लूक चाहत्यांना भावला असून त्याचे या नव्या लूकमधील अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
दरम्यान, धोनी लांब केसांच्या या नव्या लूकसह आयपीएल 2024 स्पर्धा खेळणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.