Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी 7 जुलै 2023 रोजी त्याचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे.
धोनीचा वाढदिवस खास करण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. याचबरोबर काही शहरात त्याचे मोठमोठे कटआऊट्सही लागलेले दिसत आहेत.
आंध्रप्रदेशमधील नंदीग्राम शहरात धोनीच्या चाहत्यांनी विशाल 77 फुटाचे त्याचे कटआऊट लावले आहे.
तसेच हैदराबादमधील त्याच्या चाहत्यांनी 52 फुटाचे कटआऊट्स लावले आहे.
दरम्यान धोनीचे कटआऊट लागण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी असे विशाल कटआऊट्स लावण्यात आले आहेत.
धोनीला भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार समजले जाते. त्याच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 वर्ल्डकप, 2011 वनडे वर्ल्डकप आणि 2013 चॅम्पिटन्स ट्रॉफी अशी तीन आयसीसी विजेतीपदे जिंकली आहेत.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 526 सामने खेळले असून 44.96 च्या सरासरीने 11 शतके आणि 108 अर्धशतकांसह 17266 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने यष्टीरक्षक म्हणून 829 विकेट्स घेतल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 विजेतीपदं जिंकणाराही कर्णधार आहे.
धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 सरासरीने आणि 135.92 स्ट्राईक रेटने 5082 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने यष्टीरक्षण करताना 180 विकेट्स (138 झेल आणि 42 यष्टीचीत) घेतल्या आहेत.