Pranali Kodre
कॅप्टन कूल एमएस धोनीसाठी 23 डिसेंबर ही तारीख खूप खास आहे.
धोनीने 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 डिसेंबर 2004 रोजी बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केले होते.
पण, पदार्पणाच्या सामन्यातच धोनीला शुन्य धावेवरच यष्टीरक्षक खालेद मशुद आणि तपश बैस्या यांनी मिळून धावबाद केले होते.
मात्र, त्यानंतर धोनीने यशस्वी कारकिर्द घडवली. तो भारताचा दिग्गज यष्टीरक्षक आणि यशस्वी कर्णधारांमध्ये गणला जातो.
त्याच्याच नेतृत्वाखाली भारताने आयसीसीचा 2011 चा वनडे वर्ल्डकप, 2007चा टी20 वर्लडकप आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
त्याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 538 सामने खेळताना 44.96 च्या सरासरानी 16 शतकांसह 17266 धावा केल्या आहेत. तसेच त्याने यष्टीमागे 829 विकेट्स घेतल्या.
MS Dhoni विशेष म्हणजे पदार्पणाच्या सामन्याप्रमाणेच धोनी 2019 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळतानाही धावबाद झाला होता.
धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून 15 ऑगस्ट 2020 रोजी निवृत्ती घेतली.