Pranali Kodre
भारताचा महान कर्णधार एमएस धोनी याला 8 वर्षांची मुलगी आहे.
धोनीने 4 जुलै 2010 मध्ये साक्षी सिंग रावत बरोबर लग्नगाठ बांधली होती.
लग्नानंतर माही आणि साक्षी यांना 8 फेब्रुवारी 2015 रोजी कन्यारत्न प्राप्त झाले.
त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव झिवा ठेवले आहे.
झिवाचे अनेक फोटो साक्षी आणि धोनी दोघेही शेअर करत असतात.
विशेष म्हणजे झिवाचे इंस्टाग्रामवर अकाउंट देखील आहे.
झिवाचे हे इंस्टाग्राम अकाऊंट तिचे पालक म्हणजेच साक्षी आणि धोनी सांभाळतात.
तिच्या अंकाउंटला 2 मिलियन फॉलोवर्स आहेत.
तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरही तिचे अनेक गोंडस फोटो पोस्ट केले जातात.