IPL मध्ये धोनी पाचहजारी मनसबदार

Pranali Kodre

आयपीएल 2023 मध्ये 3 एप्रिल 2023 रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात सामना पार पडला.

MS Dhoni | Dainik Gomantak

या सामन्यात खेळताना धोनीने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत पहिल्या दोन चेंडूतच दोन षटकार ठोकले आणि 5000 धावा पूर्ण केल्या.

MS Dhoni | Dainik Gomantak

आता धोनीच्या आयपीएलमध्ये 236 सामन्यांमध्ये 5004 धावा झाल्या आहेत. धोनी आयपीएलमध्ये 5000 धावा करणारा एकूण 7 वा खेळाडू आहे.

MS Dhoni | Dainik Gomantak

धोनीव्यतिरिक्त 3 एप्रिल 2023 पर्यंत विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना या भारतीय खेळाडूंनी, तर डेव्हिड वॉर्नर आणि एबी डिव्हिवियर्स या परदेशी खेळाडूंनी आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा पार केला आहे.

Virat Kohli | AB de Villiers | Dainik Gomantak

विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून त्याने 224 सामन्यात 6706 धावा केल्या आहेत.

Virat Kohli | Dainik Gomantak

तसेच शिखर धवनने 207 सामन्यांमध्ये 6284 धावा केल्या आहेत.

Shikhar Dhawan | Dainik Gomantak

डेव्हिड वॉर्नरने 163 सामन्यांमध्ये 5937 धावा केल्या आहेत.

David Warner | Dainik Gomantak

रोहित शर्माने 228 सामन्यांमध्ये 5880 धावा केल्या आहेत.

Rohit Sharma | Dainik Gomantak

सुरेश रैना या यादीत पाचव्या क्रमांकावर असून 205 सामन्यांत 5528 धावा केल्या आहेत.

Suresh Raina | Dainik Gomantak

एबी डिव्हिलियर्सने 184 सामन्यांमध्ये 5162 धावा केल्या आहेत.

AB de Villiers | Dainik Gomantak
IPL 2023 | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी