Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स संघात अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला.
या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 5 विकेट्सने विजय मिळवला.
त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएल विजेतेपद नावावर केले.
चेन्नई संघाने या विजेतेपदाची ट्रॉफी जिंकली स्विकारल्यानंतर जोरदार जल्लोष केला.
दरम्यान, नंतर चेन्नईच्या खेळाडूंनी विजेतेपदाची ट्रॉफी संघाचा कर्णधार एमएस धोनीची मुलगी झिवा, रविंद्र जडेजाची मुलगी निध्याना, अजिंक्य रहाणेची मुलगी आर्या यांच्या हातात दिली.
चेन्नई संघातील खेळाडूंच्या मुला-मुलींनी आयपीएल २०२३ ची ट्रॉफी हातात घेतल्याचा फोटोही सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकल्याने सर्वाधिकवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
चेन्नईने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 या पाचवर्षी आयपीएलची विजेतीपदे जिंकली आहेत.