Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी भारतातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे.
'कॅप्टनकूल' धोनी भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असून त्याच्या नेतृत्वाखाली भारताने तीन आयसीसी ट्रॉफीही जिंकल्या आहेत.
दरम्यान, धोनीने दोन वर्षांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली, तरी चाहत्यांमधील त्याची क्रेझ कमी झालेली नाही.
धोनीची चाहत्यांमध्ये असलेली क्रेज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 15 जानेवारीला झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्याआधीही पाहायला मिळाली.
हा सामना झालेल्या तिरुअनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमबाहेर धोनीचे तब्बल 50 फुट उंचीच कटआऊट पाहायला मिळाले होते.
हे कटआऊट ऑल केरला धोनी फॅन असोसिएशनकडून धोनीच्या सन्मानार्थ लावण्यात आले होते.
धोनीच्या या कटआऊटचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले.
दरम्यान, याआधीही केरळमध्ये अशाप्रकारे खेळाडूंचे कटआऊट लावण्याच्या घटना घडल्या आहेत.
यापूर्वी फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धा सुरु असताना देखील केरळमध्ये लिओनल मेस्सी, नेमार, ख्रिस्तियानो रोनाल्डो या खेळाडूंची कटआऊट्स लावण्यात आले होते.