Pranali Kodre
इंडियन सुपर लीग म्हणजे आयपीएलमध्ये एमएस धोनीने 16 वर्षे पूर्ण केली आहेत.
याबद्दल चेन्नई सुपर किंग्सने धोनीसाठी खास पोस्टही शेअर केली आहे.
खरंतर 20 फेब्रुवारी 2008 रोजी आयपीएलचा पहिला लिलाव पार पडला होता.
या पहिल्या आयपीएल लिलावात धोनीला चेन्नई सुपर किंग्सने खरेदी केले होते. त्यावेळी धोनी सर्वात महागडा खेळाडूही ठरला होता.
त्यामुळे 2008 पासून धोनी चेन्नई सुपर किंग्सशी जोडलेला आहे.
तो अजूनही चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा भाग असून आता आयपीएलच्या 17 व्या वर्षातही या संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे.
चेन्नईने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या 14 हंगामात धोनीने नेतृत्वही केले असून 5 आयपीएल विजेतीपदेही जिंकली आहेत.
दरम्यान, धोनी चेन्नईवर 2016 आणि 2017 साली बंदी असताना रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळला होता.
पण, चेन्नईने 2 वर्षांच्या बंदीनंतर 2018 साली पुनरागमन केल्यावर पुन्हा धोनीकडे संघाची धूरा सोपवली.
धोनीने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 250 सामने खेळले असून 38.79 च्या सरासरीने 5082 धावा केल्या आहेत.