दैनिक गोमन्तक
पिवळे दात आणि तोंडाचा वास येणे अशा समस्यापासून सुटका मिळवायची असेल, तर हे घरगुती उपाय जे तुम्ही अगदी सहज करु शकता.
पिवळे दातांसाठी तुम्ही हर्बल पावडर घरीच बनवून वापरु शकता.
हर्बल पावडरच्या मदतीने दातांच्या समस्या आणि तोंडाच्या दुर्गंधीच्या समस्येपासूनही सुटका मिळेल.
घरी हर्बल पावडर बनवण्यासाठी काळे मीठ, ज्येष्ठमध पावडर आणि दालचिनी पावडर घ्यावी.
तसेच ते मिक्स करण्यासाठी पुदिन्याची पाने किंवा सुकी कडुलिंबाची पाने बारीक करुन घ्या, नंतर हे सर्व एकत्र करा
यानंतर ही हर्बल पावडर सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा दातांना लावा नंतर पाण्याने धुऊन घ्या.
तोंडात खोबरेल तेल लावा आणि नंतर ते स्वच्छ धुऊन टाका, तोंडाच्या समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे.
लिंबाची साल कोरडी करुन तिला नंतर दातांवर लावा तसेच केळीच्या सालचा आतील भाग दातांवर चोळू शकतात.