Akshata Chhatre
लग्नानंतर सुनेला फक्त पतीसोबतच नव्हे, तर त्याच्या कुटुंबासोबत म्हणजेच सासू-सासऱ्यांसोबत जुळवून घ्यावे लागते.
तरुण सुनांच्या अनुभवांवरून असे दिसून येते की, त्यांच्या मनात सासूबाईंना सांगण्यासारख्या अनेक गोष्टी असतात.
सासूबाईंनी हे समजून घेतले पाहिजे की त्यांची सून त्यांच्यासारखी नाही. सुनेला घरकामाचा, नवऱ्याची काळजी घेण्याचा आणि इतर नातेसंबंधांचा अनुभव तुमच्यासारखा नाही.
तुमचा मुलगा आता तिचा पती आहे आणि जर तो तिच्याशी काही गोष्टी शेअर करत असेल तर त्यात काहीही गैर नाही. मुलाच्या लग्नानंतरही त्याने लग्नापूर्वी जसे वागावे तशी अपेक्षा बाळगू नका.
सुनेच्या कामाची पद्धत आणि सवयी तुमच्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. ती एक सतत चुका करणारी व्यक्ती नाही, हे समजून घ्या.
प्रत्येक कुटुंबात वाद आणि मतभेद होत असतात, पण ते प्रेम आणि समजूतदारपणाने सोडवले पाहिजेत. सतत टोमणे मारणे किंवा टीका करणे टाळा.
नात्यातील समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्या दूर होत नाहीत. नात्यात प्रेम आणि आपुलकी दाखवण्याची पहिली जबाबदारी तुमची आहे.