Pranali Kodre
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात 14 ऑक्टोबर रोजी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत सामना खेळवला जाणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान संघात होणारा हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरु होईल.
दरम्यान, या सामन्यापूर्वी वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 भारतीय गोलंदाजांवर नजर टाकू.
भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने पाकिस्तानविरुद्ध वनडे वर्ल्डकपमध्ये 2 सामने खेळले असून 8 विकेट्स घेतल्या आहेत.
माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ पाकिस्तानविरुद्ध वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 4 सामन्यांत 7 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने वर्ल्डकपमध्ये 3 वनडे सामन्यांत 5 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज झहीर खान वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 2 सामने खेळला असून त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 2015 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध एकच सामना खेळला असून यात त्याने शानदार कामगिरी करताना 4 विकेट्स घेतल्या होत्या.
आशिष नेहरानेही वनडे वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध 2 सामने खेळले असून 4 विकेट्स घेतल्या आहेत.