दैनिक गोमन्तक
2022मध्ये सर्वात जास्त गुगलवर सर्च करण्यात आलेली औषधं कोणती? हे आपण पाहूया.
'Donanemab' हे अल्झायमर रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी वापरत येणारे जैविक औषध आहे.
Tirzepatide (तिर्जेपाटाइड) हे औषध शरीरात उपलब्ध इन्सुलिन वाढवून ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करण्याचे काम करते.
Gantenerumab -(गेंटेनेरुमाब) हे औषध अल्झायमर रोग असलेल्या रुग्णांसाठी या औषधाचा वापर होतो.
Deucravacitinib- (डेउक्रावासिटिनिब) हे औषध सोरायसिस या त्वचा रोगासाठी ज्यामध्ये शरीराच्या काही भागांवर लाल, खवले चट्टे तयार होतात त्यावर उपचार करण्यासाठी वापरतात.
Bardoxolone -(बार्डोक्सोलोन) या औषधाचा वापर मूत्रपिंडाच्या पेशंटवर उपचार करण्यासाठी केला जातो.
Tezepelumab ekko- या (टेझेपेलुमॅब) इंजेक्शनचा वापर श्वास घेण्यास त्रास, छातीत घट्टपणा आणि अस्थमामुळे होणारा खोकला टाळण्यासाठी केला जातो.
Mavacamten (मावाकमटेन) हृदयाशी संबंधीत समस्या असल्यास या औषधाचा वापर करण्यात येतो.
Vutrisiran - (वुट्रिसीरन) या औषधाचा वापर पॉलिन्यूरोपॅथीच्या उपचारांसाठी केला जातो.