Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 22 ऑक्टोबर रोजी भारताने धरमशालेत झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला.
या सामन्यात विराट कोहलीने 95 धावांची खेळी केली.
या खेळीबरोबरच त्याने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सनथ जयसूर्याला मागे टाकत चौथा क्रमांक मिळवला.
विराटच्या आता वनडेमध्ये 286 सामन्यांत 58.16 च्या सरासरीने 13437 धावा झाल्या आहेत.
सनथ जयसूर्या आता या यादीत पाचव्या क्रमांकावर आला असून त्याने 445 वनडे सामन्यांत 32.36 च्या सरासरीने 13430 धावा केल्या आहेत.
वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने 463 सामन्यांत 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कुमार संगकाराने 404 वनडे सामन्यांत 41.98 च्या सरासरीने 14234 धावा केल्या आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंग आहे. त्याने 375 वनडे सामन्यांत 42.03 च्या सरासरीने 13704 धावा केल्या आहेत.