Pranali Kodre
इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर पार पडलेल्या कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पण, हा सामना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासाठी वैयक्तिकदृष्ट्या विक्रमी ठरला.
रोहित आणि विराट या दोघांसाठीही हा आयसीसी स्पर्धेतील सहावा अंतिम सामना आहे. त्यामुळे भारताकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळण्याच्या बाबतीत विराट आणि रोहित संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आले.
भारताकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आहे. त्याने आयसीसी स्पर्धांचे 7 अंतिम सामने खेळले आहेत.
युवराजने 2000 आयसीसी नॉकआऊट टूर्नामेंट, 2002 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2003 वर्ल्डकप, 2007 टी२० वर्ल्डकप, 2011 वर्ल्डकप, 2014 टी20 वर्ल्डकप आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत.
भारताकडून सर्वाधिक आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयसीसी स्पर्धांचे 5 अंतिम सामने खेळले आहेत.
एमएस धोनीने 2007 टी20 वर्ल्डकप 2011 वर्ल्डकप, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2014 टी20 वर्ल्डकप आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसी स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत.
विराटने 2011 वर्ल्डकप, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2014 टी20 वर्ल्डकप, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019-21 कसोटी चॅम्पियनशीप आणि आता 2021-23 कसोटी चॅम्पियनशीप या स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत.
रोहितने 2007 टी20 वर्ल्डकप, 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2014 टी20 वर्ल्डकप, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019-21 कसोटी चॅम्पियनशीप आणि आता 2021-23 कसोटी चॅम्पियनशीप या स्पर्धांचे अंतिम सामने खेळले आहेत.