Pranali Kodre
भारतीय संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा हा टेस्ट स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जातो.
त्याने नुकताच रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेत खेळताना भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 12 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला.
भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 12 हजार धावांचा टप्पा ओलांडणारा तो दुसऱ्याच क्रमांकाचा खेळाडू आहे.
भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या वासिम जाफरच्या नावावर आहे.
जाफरने भारतात 186 प्रथम श्रेणी सामने खेळताना 14609 धावा केल्या आहेत.
त्यापाठोपाठ पुजाराने आत्तापर्यंत भारतात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 145 सामन्यांमध्ये 12011 धावा केल्या आहेत.
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने भारतात खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 118 सामन्यांमध्ये 9677 धावा केल्या आहेत.
या यादीत चौथ्या क्रमांकावर गौतम गंभीर आहे. त्याने भारतात 126 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9655 धावा केल्या आहेत.
तसेच पार्थिव पटेल या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने भारतात खेळलेल्या 153 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9500 धावा केल्या आहेत.