Pranali Kodre
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सेंच्युरियनला वनडे मालिकेतील चौथा सामना 15 सप्टेंबर रोजी झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 164 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 416 धावा उभारल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावावर मोठा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.
दक्षिण आफ्रिकेने वनडेत तब्बल सातव्यांदा 400 धावांचा टप्पा पार केला आहे. हा विश्वविक्रम आहे.
दक्षिण आफ्रिकेने वनडेत सर्वाधिकवेळा 400 धावांचा टप्पा पार करणाऱ्या संघांच्या यादीत भारताला मागे टाकत अव्वल क्रमांक मिळवला आहे.
भारताने वनडेत 6 वेळा 400 धावांचा टप्पा पार केला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या पाठोपाठ इंग्लंड असून त्यांनी वनडेत 5 वेळा 400 धावांचा टप्पा पार केला आहे.
विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंग्लंड हे तिन्ही संघ 400 धावांचा टप्पा पार केल्यानंतर पराभूत झालेले नाहीत.
दरम्यान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी वनडेत प्रत्येकी दोन वेळा 400 धावांचा टप्पा केला आहे.
न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे या दोन संघांनी वनडेत प्रत्येकी एक वेळा 400 धावांचा टप्पा केला आहे.