Sameer Amunekar
चालल्याने हाडांची घनता टिकून राहते व सांध्यांतील हालचाल सुधारते. रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहण्यास मदत होते त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
चालल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणा अधिक चांगली काम करते. नियमित चालल्याने झोपेचा दर्जा सुधारतो.
चालण्यामुळे हृदय अधिक मजबूत होते. रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसंच नियमित चालण्यामुळे कॅलरी जळतात आणि शरीराचे वजन संतुलित राहते.
सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामुळे शरीराला व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडांसाठी आवश्यक आहे.
नियमित चालल्याने झोपेचा दर्जा सुधारतो, उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. दररोज किमान 30 मिनिटे चालणे योग्य आहे.
सकाळी चालण्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते, आणि सकारात्मक जीवनशैली विकसित होते.
सकाळी चालल्याने मेंदूला ताजेतवाने वाटते, आणि विचारशक्ती सुधारते.