Akshay Nirmale
गोव्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यातील काणकोण तालुक्यात दोन समुद्र किनारे कासवांसाठी आरक्षित आहेत. या दोन किनाऱ्यांवर मिळून 49 सागरी कासवांनी अंडी घातली आहेत.
आगोंद किनाऱ्यावर 36 सागरी कासवांनी आत्तापर्यंत 3600 हून अधिक अंडी घातली आहे.
आगोंद किनाऱ्यावरून एकूण 36 घरट्यांपैकी काही घरट्यात 100 ते 145 अंडी घातली आहेत.
गालजीबाग किनाऱ्यावर कासवांची 13 घरटी आहेत.
गालजीबाग या किनाऱ्यावरून कासवाची 67 पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत.
दक्षिण गोव्यात कोणत्याही किनाऱअयावर सागरी कासवाचे आगमन होऊन त्याने अंडी घातल्यास संरक्षणासाठी ती गालजीबाग किनाऱ्यावर स्थलांतरित केली जातात.
दरम्यान, ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासवांनी मांद्रे बीचवर 2900 अंडी घातली आहेत.