गोमन्तक डिजिटल टीम
पावसाळा सुरू होताच वातावरणात बदल झाल्याने अनेक लोक आजारी पडायला लागतात. आशा वेळी स्वतःला सुरक्षित ठेवणे गरजेचे असते. यासाठी आपण काही उपाय जाणून घेऊयात.
पावसाळ्यात पाणी हे दुषीत होण्याचे प्रमाण वाढते. अशुद्ध पाणी पिल्याने किंवा अशुद्ध पाण्याच्या आजुबाजूला राहिल्याने देखील तुम्ही आजारी पडू शकता.
चहा आणि सूप व्यतिरिक्त तुम्ही हर्बल टी देखील पीत रहा या वातावरणात फायेदशीर ठरु शकते.
पाऊस कधीही सुरु होतो. अशा वेळी स्वतःची सुरक्षा ठेवणे गरजेचे असते. अशावेळी छत्री किंवा रेनकोट तुम्ही सोबत ठेवा.
पावसात तुम्ही भिजले असाल तर आधी स्वतः ला कोरडे करा. अन्यथा तुम्हाला सर्दी आणि इंफेक्शनचा धोका वाढू शकतो.
पावसाळ्यात वातावरणात गारवा झालेला असतो. अशा वेळी तुम्हाला काही गरम खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही सूप, गरम दूध किंवा अद्रकचा चहा पिऊ शकता.
पावसाळ्यात ठिक ठिकाणी पाणी साचलेले असते. अशा वेळी माश्या आणि डासचे प्रमाण वाढलेले असते. यामुळे बाहेरचे खाणे टाळले पाहिजे.
पावसाळ्यात पायाच्या नखांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष द्या. येथे तुम्हाला इंफेक्शन होण्याची शक्यता असते.