Monsoon Home Care Tips: पावसाळ्यात घर कसं ठेवाल सुरक्षित? फॉलो करा 'या' 8 टिप्स!

दैनिक गोमन्तक डिजिटल

छताची दुरुस्ती आणि स्वच्छता करा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी छतावरील पालापाचोळा आणि कचरा पूर्णपणे साफ करा.

छताला कुठे तडे (Cracks) गेले असल्यास वॉटरप्रूफिंग करून घ्या, जेणेकरून पाणी झिरपणार नाही.

Monsoon Home Care Tips | Dainik Gomantak

पाण्याचे पाईप्स आणि गटारे साफ ठेवा

घराभोवती असणारे पाण्याचे पाईप्स (Rainwater Pipes) आणि सांडपाण्याची गटारे तुंबणार नाहीत याची खात्री करा.

पाईप्स ब्लॉक असल्यास पावसाचे पाणी घरात किंवा भिंतींमध्ये शिरण्याचा धोका असतो.

Monsoon Home Care Tips | Dainik Gomantak

वायरिंग आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची सुरक्षा

घरात कुठेही उघड्या वीज तारा (Open Wires) किंवा खराब झालेले सॉकेट्स असल्यास ते त्वरित बदलून घ्या.

भिंतींना ओलावा असेल तर त्या भागातील स्विच बोर्ड वापरणे टाळा; शॉर्ट सर्किटचा धोका संभवतो.

Monsoon Home Care Tips | Dainik Gomantak

खिडक्या आणि दरवाजांचे गॅप्स बंद करा

लाकडी दरवाजे आणि खिडक्या पावसाळ्यात फुगतात. त्यामुळे ते व्यवस्थित लागावेत म्हणून ऑयलिंग करून घ्या.

खिडक्यांच्या काचांमधील गॅप्स सिलिकॉन जेलने सील करा, जेणेकरून पावसाचे पाणी आत येणार नाही.

Monsoon Home Care Tips | Dainik Gomantak

भिंतींमधील ओलावा आणि बुरशी रोखा

पावसाळ्यात घरात दमट वातावरणामुळे कपड्यांना किंवा कोपऱ्यात बुरशी लागते.

कपाटात डांबरगोळ्या (Naphthalene Balls) किंवा कडुनिंबाची पाने ठेवा, ज्यामुळे दुर्गंधी दूर राहील.

Monsoon Home Care Tips | Dainik Gomantak

लाकडी फर्निचर भिंतीपासून दूर ठेवा

  • ओल्या किंवा दमट भिंतींना लाकडी फर्निचर (सोफा, कपाट, बेड) चिकटवून ठेवू नका.

  • यामुळे फर्निचर खराब होऊ शकते. फर्निचर आणि भिंतीमध्ये किमान ३-४ इंचाचे अंतर ठेवा.

Monsoon Home Care Tips | Dainik Gomantak

डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव रोखा

पावसाळ्यात डासांचे प्रमाण वाढते. घराच्या खिडक्यांना जाळ्या (Mesh) बसवून घ्या.

घराच्या आसपास कुठेही पाणी साचू देऊ नका, जेणेकरून डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांना आळा बसेल.

Monsoon Home Care Tips | Dainik Gomantak

झाडांच्या फांद्यांची छाटणी करा

घराच्या अगदी जवळ किंवा छतावर झुकलेल्या मोठ्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वीच छाटून घ्या.

वादळी वाऱ्यामुळे फांद्या तुटून घराचे किंवा विजेच्या तारांचे नुकसान होण्यापासून बचाव होईल.

Monsoon Home Care Tips | Dainik Gomantak

शरीरातील चरबी जाळण्यासाठी हे 7 ड्रिंक्स आहेत गुणकारी

Healthy Morning Drinks | Dainik Gomantak
येथे क्लिक करा