गोमन्तक डिजिटल टीम
निरोगी केसांसाठी प्रथिने युक्त आहार घेणे गरजेचे आहे. याच्या मदतीने तुम्ही केसांचे मुळ मजबूत करू शकता. चीज आणि बीन्स इत्यादी प्रथिनांचे उत्कृष्ट स्रोत आहेत.
झिंक आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असलेला आहार घ्यावा. अक्रोड, बदाम आणि काजू यांसारख्या सुक्यामेव्यांचा आहारात समावेश करू शकता.
पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी केसांसाठी असा शॅम्पू निवडा ज्यामुळे केसांना कोणतीही हानी होणार नाही.
जर तुमचे केस पावसाळ्यात निर्जीव आणि कोरडे झाले असतील तर केसांना मुलतानी मातीचा पॅक लावा.
पावसाळ्यात केस वाळवण्यासाठी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करु नका. जर तुम्ही केसांसाठी जास्त उष्णतेचे उपकरण वापरत असाल तर त्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते.
केसांसाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकता. कोरफडमध्ये अ, क आणि ई जीवनसत्त्वे असतात.
मेथीच्या दाण्यामधून शरीरातील इन्सुलिन सुधारण्यास मदत होते. आपण कोमट खोबऱ्याच्या तेलात मेथीचे दाणे घालून टाळूवर मसाज करू शकता. केस न गळण्यास मेथीचे दाणे उपयुक्त ठरेल.
पावसाळ्यात नियमितपणे केसांच्या मुळात मसाज करावे. यामुळे तुमचे केस निरोगी राहतील. मसाज केल्याने केसांना पोषण मिळते.
पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी तुम्ही दही आणि लिंबाचाही वापर करू शकता. दही आणि लिंबू एकत्र करून स्कॅल्प वर लावा. थोडा वेळ तसेच राहू द्या, नंतर केस धुवा. एकत्र लावल्याने केस गळणे कमी होते. तसेच कोंड्याच्या समस्येपासून देखील सुटका मिळेल.