Monsoon Gardening Tips: पावसाळ्यात बाग हिरवीगार अन् टवटवीत ठेवण्यासाठी 8 सोप्या टिप्स

दैनिक गोमन्तक डिजिटल

पाण्याचा योग्य निचरा

पावसाळ्यात कुंडीत पाणी साचून राहिल्यास झाडांची मुळे सडू शकतात. त्यामुळे कुंडीच्या तळाशी असलेले छिद्र उघडे आहे की नाही, याची खात्री करा जेणेकरून अतिरिक्त पाणी लगेच वाहून जाईल.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

माती मोकळी करा

पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे कुंडीतील माती कडक होते. आठवड्यातून एकदा खुरप्याच्या मदतीने झाडांच्या मुळांभोवतीची माती हलकी (भुसभुशीत) करा, जेणेकरून मुळांना ऑक्सिजन मिळेल.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

पाणी देणे कमी करा

पावसाळ्यात हवेत आधीच आर्द्रता असते. त्यामुळे झाडांना रोज पाणी देण्याची गरज नसते. मातीचा वरचा थर सुकलेला दिसल्यास किंवा पावसाची उघडीप असल्यास गरजेनुसारच पाणी द्या.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

छाटणी करा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा सुरुवातीला झाडांच्या सुकलेल्या फांद्या आणि पिवळी पडलेली पाने कापून टाका. यामुळे झाडांची वाढ चांगली होते आणि नवीन फुटवे फुटण्यास मदत होते.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

बुरशीनाशकाचा वापर

पावसाळ्यात दमट वातावरणामुळे झाडांवर बुरशी (Fungus) आणि कीड लागण्याचा धोका जास्त असतो. यापासून बचावासाठी आठवड्यातून एकदा झाडांवर कडुलिंबाचे तेल (Neem Oil) किंवा सेंद्रिय बुरशीनाशकाची फवारणी करा.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

नैसर्गिक खतांचा वापर

पावसाच्या पाण्यासोबत मातीतील पोषक तत्वे वाहून जातात. त्यामुळे झाडांना ताकद मिळण्यासाठी शेणखत, गांडूळ खत (Vermecompost) किंवा सुक्या पानांचे सेंद्रिय खत थोड्या प्रमाणात द्या.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

कुंड्यांची जागा बदला

अति पावसामुळे इनडोअर प्लांट्स (घरातील झाडे) किंवा ज्या नाजूक झाडांना जास्त पाणी मानवत नाही, ती झाडे गॅलरीच्या किंवा घराच्या सुरक्षित भागात हलवा, जिथे थेट मुसळधार पाऊस पडणार नाही.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

तण काढून टाका

पावसाळ्यात कुंडीत किंवा बागेत झाडाच्या बाजूला बिनकामाचे गवत (तण) वेगाने वाढते. हे तण मुख्य झाडाचे पोषक घटक शोषून घेते. त्यामुळे हे तण वेळोवेळी उपटून टाका.

Monsoon Gardening Tips | Dainik Gomantak

प्राण्यांना आजारांपासून वाचवण्यासाठी 'या' 7 गोष्टींची घ्या विशेष काळजी

Monsoon Pet Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा