Manish Jadhav
पावसाळा म्हणजे आल्हाददायक वातावरण, गरमागरम चहा आणि भजी! पण यासोबतच, पावसाळ्यात अनेक आजारांचा धोकाही वाढतो.
आज (13 जुलै) आपण अशा 8 खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे या पावसाळ्यात तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवून तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतील.
पावसाळ्यात लसूण हे तुमच्या आहारातील अविभाज्य भाग असायला हवेत.
हळद हे एक नैसर्गिक अँटीबायोटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हळदीचे दूध किंवा भाज्यांमध्ये हळदीचा वापर केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातील सूज कमी होते.
पावसाळ्यात मिळणारी हंगामी फळे जसे की, सफरचंद, पेरु, डाळिंब आणि चेरी ही व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेली असतात.
गरमागरम आणि पौष्टिक भाज्यांचे सूप पावसाळ्यासाठी उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही गाजर, भोपळा, पालक, ब्रोकोली यांसारख्या भाज्या वापरु शकता.
जिरे, धणे, मिरी, लवंग, वेलची यांसारख्या घरगुती मसाल्यांचा आहारात वापर करा. हे मसाले पचनक्रिया सुधारतात आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
पावसाळ्यात पचनशक्ती सुधारण्यासाठी दही किंवा ताक उपयुक्त ठरते. यात असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांचे आरोग्य सुधारतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
पावसाळ्यात शक्यतो गरम किंवा कोमट पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांपासून संरक्षण मिळते.