Akshata Chhatre
जेव्हा बास गिटारीस्ट मोहिनी डे मंचाचा ताबा घेते तेव्हा लोक अवाक होऊन तिच्या सादरीकरणात गुंग होतात.
हसा बेस गिटार हे मर्दानी वाद्य समजले जाते. 'सुरुवातीला लोकांना वाटले की मी ते वाद्य चांगले वाजवू शकणार नाही कारण त्यासाठी शारीरिक ताकद लागते.'
परंतु माझे वडील, ज्यांनी माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी मला बास वाजवायला शिकवले, त्यांच्या कल्पना वेगळ्या होत्या. ते काळाच्या पुढे होते आणि त्यांचा मला पूर्ण पाठिंबा होता.'
वडिलांबरोबरच रणजीत बारोट आणि लुईस बँक या प्रसिद्ध संगीतकारांकडूनही तिला पुढील काळात पाठिंबा मिळत राहिला आणि तिची वाटचाल चालूच राहिली.
ती सांगते, 'माझ्या यशामागे नक्कीच पुरुषांचा वाटा आहे. मी पुरुषांच्या उत्कृष्ट अशा बँडमध्ये बास वाजवून मोठी झाली आहे'
सुरुवातीला त्यांना वाटायचे की एक लहान मुलगी काय वाद्य वाजवणार पण जेव्हा ते मला ऐकत तेव्हा ते आश्चर्यचकित होत असत.
अलीकडच्या काळात तिने सुप्रसिद्ध गायिका विलो स्मिथ बरोबर वाजवले आहे. ए. आर. रहमान सोबतही तिने कार्यक्रम केला आहे. सेरेंडिपिटी कला महोत्सवात तिला तीन वेळा आमंत्रित केले गेले आहे.