Pranali Kodre
आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर झाला.
अंतिम सामन्यात भारताने 10 विकेट्सने विजय मिळवला. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने मोलाचा वाटा उचलला.
मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावांत 6 विकेट्स घेतल्या, यातील चार विकेट्स त्याने चौथ्याच षटकात घेतल्या.
सिराजने चौथ्या षटकात पाथम निसंकाला (2) पहिल्या चेंडूवर, सदिरा समरविक्रमाला (0) तिसऱ्या चेंडूवर, चरिथ असलंकाला (0) चौथ्या चेंडूवर आणि धनंजय डी सिल्वाला (4) सहाव्या चेंडूवर बाद केले.
त्यामुळे सिराज हा वनडे क्रिकेटमध्ये एकाच षटकात चार विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
त्याने नंतर श्रीलंकेचा कर्णधार दसून शनका आणि कुशल मेंडिस यांनाही बाद केले.
तो भारताकडून वनडेत सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला.
सिराजला त्याच्या या कामगिरीबद्दल सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आले.
दरम्यान, आशिया चषकात पावसाचा अडथळा येत असताना श्रीलंकेतील ग्राउंडस्टाफने घेतलेली मेहनत लक्षात घेत सिराजने सामनावीर पुरस्कारासाठी मिळालेली बक्षीस रक्कम त्यांना देऊ केली.