दैनिक गोमन्तक
त्वचा आणि केसांसाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही मोगऱ्याच्या फुलांचा वापर करू शकता.
मोगऱ्याचा सुंदर सुगंध प्रत्येकाला आवडतो.
मोगऱ्याच्या सुगंधामुळे आसपासच्या वातावरणात प्रसन्नता निर्माण होते आणि मेंदू शांत होतो.
त्वचेचा रंग आणि पोत सुधारण्यासाठी मोगऱ्याच्या देठांची पेस्ट करून मास्क प्रमाणे चेहऱ्यावर लावावी.
पाण्यामध्ये मोगऱ्याच्या तेलाचे काही थेंब मिक्स करून आंघोळ करावी.
यामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा देखील मिळतो.
शरीराला दुर्गंधही येत नाही.